डॉ. विजय बिडकर यांना अभिवादन
डांग सेवा मंडळ नाशिक संचालित डॉ. विजय बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणे येथे डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉ. विजय बिडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रा. डॉ. रवींद्र पगार यांनी आपल्या मनोगतातून डॉ. विजय बिडकर यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दलची माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. के. मगरे, डॉ. डी. जे. नेरपगार,डॉ.एस.आर.थोरवत,प्रा.डी.डी.हळदे,डॉ.एम.एन.पवार,प्रा.के.पी.पवार, हर्षदा राजभोज, प्रकाश महाले, लता बागुल, पुजा भालेराव, निकिता पवार, राजू पगारे, मंगेश जाधव, अशोक काटे, महेंद्र पाटील, अविनाश जाधव सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते